Project Detail
मराठा विद्या प्रसारक समाज, सक्करदरा चौक, रघुजी नगर
नागपूर द्वारे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव हा दि. १९
फेब्रुवारीला तारखे प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव निमित्य विविध कार्यक्रम राबविले जातात. हा सोहळा साप्ताहिक सोहळा म्हणून साजरा केला जातो. ज्यात रोज नवीन वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात जसे लहान मुलांसाठी
विविध स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा , क्रीडा स्पर्धा ई , शिव्संध्या संगीतमय अथवा नाट्य कार्यक्रम , समाज प्रबोधनपर विविध विषययावर व्याख्यान , एकांकिका , खंजिरी वादन , रक्त दान शिबीर, रोग निदान शिबीर असे
विविध कार्यक्रम राबविले जातात. १९ फेब्रुवारीला सकाळी भव्य स्कूटर रली व संध्याकाळी भव्य शोभा यात्रा काढण्यात येत असते. याला सर्वच समाजाचे सर्व स्तरावरील लोकाचा उत्स्फूर्त पाठींबा मिळतो. मागील काही वर्षा पासून
हा कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा केला जात आहे. यातून एक समाज बांधिलकीचा संदेश देण्याचा समाजाचा उद्देश आहे. या सामाजिक कार्यात संस्थेला मदत करणाऱ्या सर्वांचा समाज आभारी व ऋणी आहे.