शिष्यवृत्ती व गुणवत्ता विध्यार्थी गौरव कार्यक्रम २०२४ - १८.८.२४

Project Detail

“मराठा विद्या प्रसारक समाजातर्फे रु. २ लाख ३० हजार शिष्यवृत्ती चे वाटप”

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर तर्फे मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिष्यवृत्ती वाटप समारंभ रविवार  दि.१८.०८.२०२४  ला सकाळी १० वा. संस्थेच्या सक्करदरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहात संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ.राजे मुधोजी भोंसले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला श्री राहुल बागल (एमडी-मानोपसचार तज्ञ) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  याप्रसंगी समाजातील २५०  चे वर होतकरू व गरजू विद्यार्थांना २ लाख ३० हजार रु. ची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. तसेच विशेष क्षेत्रात कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थांचा याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर या संस्थेच्या mvpsnagpur.org.in या नवीन वेबसाईट चे शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोंसले यांचे शुभ हस्ते करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे मुख्य सचिव डॉ.प्रकाश मोहिते यांच्या मातोश्री श्रीमती मंदाकिनी मधुकरराव मोहिते यांनी आपले  दिवंगत पती "मधुकर बाबुराव मोहिते" यांचे  स्मृती प्रित्यर्थ रु.५१,०००/- तर संस्थेचे आजीव सभासद श्री सचिन सुभाषराव काळे यांनी रु.११,०००/- शिष्यवृत्ती निधी संस्थेला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिष्यवृत्ती वाटप समितीचे मुख्य संयोजक श्री दिलीप सस्ते यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्या सौ. अनिताताई जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन सदस्य श्री गजानन कावळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रविण शिर्के, शिरीष राजेशिर्के, राजेश काटे, निलेश चव्हाण, डॉ. प्रकाश मोहिते, प्रशांत (बालू ) भोसले, अनुप जाधव,  सतीश मोहिते, सौ. ममताताई भोसले, नरेंद्र मोहिते, महेंद्र शिंदे, अविनाश घोगले, हरीश इंगळे, अमर पिसाळ, सुशांत शिंदे, ललित पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांची व विद्यार्थांची उपस्थिती होती,हे विशेष....!!

Project Photos

Project Video