शिष्यवृत्ती व गुणवत्ताप्राप्त विध्यार्थी गौरव कार्यक्रम

Project Detail

मराठा विद्या प्रसारक समाजाचे वतीने शिष्यवृत्ती कार्यक्रम हा मागील ५० वर्षापासून सुरु आहे. समाजातील हुशार , होतकरू व गरजू विध्यार्तांना त्यांच्या शिक्षणात अडचण येवू नये व ते आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणा पासून वंचित राहू नये या एकमेव उद्देश्याने हा उपक्रम संस्थेद्वारे राबविल्या जात आहे. यात समाजाचे दानवीर समाज बांधवांचे सुद्धा संस्थेला सहकार व सहयोग वेळोवेळी मिळत असतो . समाज अश्या दानशूर व्यक्तींचा सदैव ऋणी व आभारी आहे. या उपक्रमातून बरेच विद्यार्थांना आपले शिक्षण पूर्ण करता आले व आज ते समाजामध्ये विविध स्तरावर काम करीत आहे. शिक्षणाचा प्रसार व प्रचार या बहुमूल्य उद्देश्याने सुरु केलेल्या या कार्याला संपूर्ण समाज स्तरावरून मदत मिळते . या माध्यमातून समाजातील आर्थिक दुर्बल घटक मधील विध्यार्थांना घडविण्याचे काम ही संस्था करीत आहे.

       यासोबतच दरवर्षी १०वी व १२वी या शिक्षण मंडळाच्या परीक्षेत जे विध्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण होतात अश्या सर्व विध्यार्थ्यांचा गौरव देखील समजा मार्फत केला जातो. विध्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी आपल्या जीवनात उत्तुंग भरारी घ्यावी या उद्देश्याने संस्था हा  कार्यक्रम राबवीत असते . या कार्यक्रमाला सुद्धा समाजातील दानशूर व्यक्तीचा सहभाग मिळत असतो. याबरोबरच समाजातील बंधु- भगिनी जे विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवितात, उच्च शिक्षण पदवीधारक असतात त्याचा सुद्धा सत्कार संस्थेद्वारे दरवर्षी केला जातो. उद्देश एकच समाजातील सर्व मुला-मुलींचा व सर्व समाज बंधु-भगिनींचा सर्वांगीण विकास व्हावा. विविध क्षेत्रात त्यांना यश मिळो व समाज आणि राष्टाच्या विकासात त्यांचा सहभाग असो . या संस्थेला सर्वपरीने मदत करणाऱ्या सर्वांचा समाज आभारी व ऋणी आहे.

Project Photos

Project Video